
कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अव्वाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे.सोबत सुधारित दरपत्रक ही जाहीर केले आहे.
आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निर्देश देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.
या अधिसूचने मुळे अव्वाच्या सव्वा बिले उकळणाऱ्या खासगी कोविड सेंटर वर चाप बसेल अशी अपेक्षा आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश