
दि 5/7/2021 रोजी जि.प. प्रा शाळा वांगरवाडी येथे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री स्वामी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे एक पद एक वृक्ष लागवड करण्यात आले या वृक्ष लागवड करण्यासाठी 300 रोप जाणीव फौंडेशन व वृक्षसंवर्धन समिती बार्शी यांचे तर्फे देण्यात आले.
वृक्षारोपण करतेवेळी खांडवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरुण तिकटे समितीचे अध्यक्ष उमेश काळे व त्यांची सर्व टीम गावचे सरपंच श्री युवराज शिंदे तलाठी श्री सुतार भाऊसाहेब कृषी सहायक श्री गाढवे साहेब बार्शी पं समितीचे श्री पिंगळे सर पोलीस पाटील सौ वैशाली जगताप आप्पा घोलप रवी साळुंखे मेजर सुभाष घाडगे विनोद तुपे उमेश तुपे सुरज तुपे कातुरे सर चव्हाण सर देशमुख सर बालाजी सातपुते महेश नेवरे सोमा देशमाने शिवराम तुपे संतोष पुणेकर अनिल काळे दया तुपे सतीश लोखंडे तसेच वृक्ष संवर्धन समिती व जाणिव फाऊंडेशन चे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.सुरुवातीला वृक्षाची पूजा करून वृक्ष लागवड चालू केली.जाणीव फौंडेशन व वृक्ष संवर्धन समिती चे सर्व सदस्य मिळून गावकऱ्यांनी 300 रोपांची लागवड केली आहे शाळेतील शिक्षक श्री विश्वनाथ मुंढे यांनी प्रस्तावना केली श्री हवालदार मामा यांनी वृक्ष लागवड चे महत्व सांगितले श्री तिकटे साहेब यांनी मा CEO साहेब यांचे विचार सर्वाना सांगितले शेवटी मुख्यध्यापक श्री धनंजय कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर