
बार्शी तालुक्यातील ज्या प्राथमिक शिक्षकांना पहिला डोस मिळाला नसेल व ज्यांचा पहिला डोस होऊन ८४ दिवस झाले आहेत. अशांना लसीचा दुसरा डोस मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर यांनी पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यात ९५ लसीची उपलब्धता करून दिली.
ही लस तालुक्यातील वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर मिळणार आहे.हे लसीकरण उद्या सोमवार दिनांक २४ मे २०२१ रोजी होणार आहे.
या लसीकरणासाठी पाठपुरावा करणारे जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर यांनी माननीय मुख्याधिकारी साहेब, आरोग्य तालुका अधिकारी साहेब, गट विकास अधिकारी साहेब, गटशिक्षणाधिकारी मॅडम यांना वेळोवेळी शिक्षकांना लसीकरण मिळावे म्हणून मागणी केली होती व सर्वांनी सहकार्य केले.
तरी ज्या प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी आपापल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्या मार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे नाव नोंदणी करावी ही विनंती.
समन्वय समितीच्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सदस्य मा.मदन दराडे सर त्यांनी शिक्षकांच्या लसीकरणासाठी पहिला टप्पा म्हणून ९५ कोरोना लसीची उपलब्धता करून दिली.
याबद्दल प्राथमिक शिक्षकांच्या वतीने व बार्शी तालुका समन्वय समितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानले..
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश