टोकियो:भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. याआधी भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य,बॅक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाने हिने कांस्य पदक जिंकून दिले होते.तर आज (५ ऑगस्ट) सकाळी भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते.
कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले.त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली.तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली.त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत आघाडी ७-२ अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला.
Great