धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट २४ तासात देशामधे
६८,०२० रुग्ण आढळले तर महाराष्ट्रामध्ये ४०,४१४ देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे .
गेल्या 24 तासात तब्बल 68,020 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे . तर 32,231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . तसेच 291 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . सध्या देशात 5,21,808 रुग्णांवर उपचार सुरू आहेत .यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत .
राज्यात 40,414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2332453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 325901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत , त्यामुळे काळजी घ्या , सुरक्षित राहा .
More Stories
वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपन्न