
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा काल ऑनलाईन पद्धतीने झाली,पंढरपूर,सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या चार तालुक्यांचा वेगळा पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव यात एकमताने मंजूर झाला.
स्वतंत्र जिल्हा करावा ही मागणी बर्याच वर्षांपूर्वी पासून होत आलेली आहे व्यवहारिक दृष्टीने विचार करता जिल्ह्यात मंगळवेढा, माळशिरस,करमाळा,पंढरपूर,सांगोला हे तालुके सर्वाधिक सधन आहेत.व बागायत क्षेत्र असणारे तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या मुळे वारी व इतर काळात मिळणारे उत्पन्न प्रचंड आहे आहेत तेथूनच शासनाला जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मिळतो.मात्र त्या तुलनेत या भागाला निधीही कमी मिळतो.त्या तालुक्यातील लोकांना फक्त कार्यालयीन कामासाठी सोलापूरला जावे लागते व अंतर सुमारे दीडशे किलोमीटर इतके आहे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.दुसरीकडे खानापूर-आटपाडी मतदारसंघालाही सांगलीला जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे शंभर किलोमीटरपेक्षा अधिक लांब पडते.त्यापेक्षा या तालुक्याचीही भौगोलिक संलग्नता पंढरपूरशीच आहे. त्यामुळे त्यांना तेच जवळचे आणि सोयीचे पडते. त्यासाठी या तालुक्याचाही समावेश पंढरपूर जिल्ह्यात करावा.त्याद्वारे स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी.या चर्चेला बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध अध्यक्ष कांबळे यांनी तसा ठराव करीत असल्याचे जाहीर केले.
मध्यंतरी अकलूजकरांनीही तालुका निर्मिती साठी तीव्र आंदोलन केले होते व त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.
काल झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत चार तालुके मिळून वेगळा पंढरपूर जिल्हा निर्मितीचा ठरावघेऊन यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात अश्या सूचनाही कांबळे यांनी दिल्या.यामुळे आता पंढरपूर जिल्हा होण्याची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके