Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > पूरग्रस्तांसाठी बार्शी वेल्फेअर असोसिएशनचा बार्शीकरांच्या वतीने मदतीचा हात

पूरग्रस्तांसाठी बार्शी वेल्फेअर असोसिएशनचा बार्शीकरांच्या वतीने मदतीचा हात

मित्राला शेअर करा
पुरग्रस्तांसाठी संकलित केलेला निधी देण्यासाठी पदाधिकारी पुर ठिकाणी

बार्शी : शहरातील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी आपले कर्तव्य व सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष संवर्धन समिती,जाणीव फाउंडेशन,निमा डॉक्टर संघटना,जमियत उलमा-ई-हिंद बार्शी,गुलिस्तान महिला विकास संस्था,स्वयंदीप बहुउद्देशीय मागासवर्गीय महिला मंडळ अशा शहरातील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी फेरी काढून निधीचे संकलन करण्यात आले

शहरातील डॉक्टर्स,व्यापारी, सर्वसामान्य नागरिक गाडीवाले,छोटे दुकानदार यांनी या पूरग्रस्त निधीसाठी सढळ हाताने मदत केली. बार्शीकर नागरिकांचे व्यापाऱ्यांचे बार्शी वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

ही मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी बार्शी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी राजापूरवाडी ता.शिरोळे जि.कोल्हापूर या ठिकाणी स्वतः जाऊन ही मदत सुपूर्द केली तसेच पूरग्रस्तांच्या व्यथा व अडचणी समजून घेत त्यांना धीर देण्याचे कार्य बार्शीकरांच्या वतीने बार्शी वेल्फेअर असोसिएशन मार्फत करण्यात आले.