बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात सुमारे १२५ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करत शहीदांना श्रध्दांजली वाहत राष्ट्रप्रेम व्यक्त केले . शिबीराची सुरवात मंगळवारी सकाळी नऊ वाजता अॅड.नितीन बकाल व रामभाई शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वन करून झाली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांच्या प्रमितेचे पूजन करण्यात आले . यावेळी प्रसन्नदाता गणेश मंदिरट्रस्टचे प्रमुख कमलेश मेहता , बंडू माने , राहुल कुंकूलोळ , प्रमोद भंडारी , किशोर कांकरीया , राजाभाऊ मंजुगडे , रूपेश देवधरे , अमोल येवनकर , हर्षल रसाळ , दीपक ढगेअन्य सदस्य उपस्थित होते . सकाळी नऊ सायंकाळी या दरम्यान महिला तरूण मंडळींनी व नागरीकांनी उस्फूर्तपणे रक्त दान करत शहीदांना आदरांजली वाहिली
उन्हाळा सुरू असून रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून शहीद दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती ट्रस्ट चे संयोजक कमलेश मेहता यांनी यावेळी दिली . रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी रामभाई शाह रक्तपेढीचे कर्मचारी तसेच प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
गणेश मंदिर ट्रस्टने वैकुंठ स्मशानभूमी सुधार अन्नदान असे अनेक समाजोपयोगी उपक्रम बार्शी शहरात राबविले व आहेत याचा फायदा सर्व बार्शीकरांना होत आहे
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले