Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी येथे भव्य दिव्य हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर.

बार्शी येथे भव्य दिव्य हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर.

मित्राला शेअर करा

उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची व्यवस्था व्हावी यासाठी बार्शी येथे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे माजी जलसंधारण मंत्री तथा भुम परंडा शिवसेनेचे आमदार डॉ प्रा.तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने ७ हजार बेडचे संपूर्ण आरोग्य सेवा मोफत देणारे जम्बो कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून त्याचे उदघाटन व सुरुवात ७ मे पासून होणार आहे यामुळे रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे.

शिवसेनेचे नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हस्ते ७ मेला दुपारी १२.३१ वाजता होणार आहे . या केंद्रामुळे रुग्णांची व्यवस्था होणार आहे तर प्रशासनावरील वैद्यकीय व इतर ताण कमी होणार आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बार्शी येथील या सेंटरमुळे दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.बार्शी येथील डॉ सावंत यांच्या भगवंत इन्स्टिट्यूटच्या भव्य कॅम्पसमध्ये हा उपक्रम सुरू होणार आहे.या केंद्रात शिवसैनिक व विकासरत्न डॉ प्रा तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे नियोजन व रुग्णसेवा देण्यासाठी आवश्यक ती कामे करणार आहे.

या कोविड सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे व औषधेसह अन्य उपचार संपुर्णपणे मोफत असतील . एक्स रे कोविडच्या अनुषंगाने उपचार करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या ८ रक्त तपासणी मोफत केल्या जाणार आहेत . २ वेळेस जेवण चहा,नाश्ता तसेच प्रशिक्षित योगा शिक्षकद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य,प्रत्येक 3 रुग्णास शक्य आहे तो पर्यंत स्पेशल रूम देण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून वाढती रुग्ण संख्या व बाजूच्या तालुक्यातील अपूर्‍या आरोग्य सुविधा याचा संपूर्ण ताण बार्शी शहरावर येत होता.परिणामी रूग्णांना इंजेक्शन्सचा तुटवडा बेड उपलब्ध न होणे अश्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
त्यामुळे ही सुविधा रूग्णांना नक्कीच लाभदायक ठरेल.