Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानची आणखी एक “जादूची झप्पी”..

बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानची आणखी एक “जादूची झप्पी”..

मित्राला शेअर करा
आता ऑक्सिजन सिलेंडर बँक!

कोरोना संकटाने सर्वांचेच क़ंबरडे मोडले आहे.दहशतीचे हत्यार हातात घेऊन गतवर्षी कोरोनाने आपल्यावर आक्रमण केले. अनेकांचे प्राण गेले. उद्योग,व्यापार, शेती, नोकऱ्या आणि शिक्षणाची वाट लागली‌‌. लहान मुलांचे तर बालपणच हिरावून नेले. पहिली लाट, दुसरी लाट आणि आता चर्चा तिसऱ्या लाटेची! एकूणच जिकडे तिकडे नकारात्मकता, भीती आणि काळजीचे वातावरण असताना गरज असते ती आपल्या माणसांनी दिलेल्या भावनिक बाळाची! नेमके हेच काम सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने करीत आहे. बार्शी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देश-विदेशात विविध क्षेत्रात स्थिर आणि यशस्वी झालेले बार्शीकर भूमिपुत्र यांनी मातृभूमी परिवार गुंफला. पहिल्या लाटे पासून अन्नदानाचे कार्य या परिवाराने मोठ्या तळमळीने आणि आपलेपणाने केले‌ खरं तर ,आपल्या माणसाची संकट काळातील “जादूची झप्पी” कोणत्याही औषधापेक्षा भारी ठरते!आज सोशल मीडियावर इम्युनिटी वाढवायची तर आपले मन, आपली माणसे आणि आपल्या भोवतीचे वातावरण आनंदी ठेवण्याचा संदेश देणारे अनेक मेसेज आपण पाहत आहोत‌ डॉक्टरांची जिद्द आहे, पण त्या जिद्दीला सोयीसुविधांची जोड मिळायला हवी.बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे शिक्षणापासून व्यापार-उद्योग आणि आरोग्य सेवांसाठी बीड, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यालाही बार्शी नेहमीच आपली वाटत आलेली आहे‌ बार्शीकरांनीही त्याच भावनेला नेहमीच जीव लावला ! कोरोना सारख्या संकट काळातही हे प्रेम कमी होऊ दिले नाही. बार्शीत ऑक्सिजनच्या समस्येमुळे कोरोनाग्रस्तांना इच्छा असूनही ऍडमिट करून घेणे अनेक डॉक्टरांना शक्य नसायचे‌. नेमकी हीच वेदना जीवनज्योत संघटनेचे संस्थापक, राज्य ब्लडबँक असोसिएशनचे अध्यक्ष आणि मातृभूमी प्रतिष्ठानचे संचालक अजित कुंकुलोळ यांच्या लक्षात आली‌.त्यांनी लगेच मातृभूमी परिवारासमोर आपली ऑक्सिजन सिलेंडर बँकेची संकल्पना मांडली. मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांनी फक्त संकल्पना स्वीकारलीच नाही तर ती साकार करण्यासाठी स्वतः पाच लाख रुपयांची देणगी देण्याची तयारी ठेवली. मग काय शहरातील डॉक्टर्सही पुढे सरसावले. अनेकांनी सिलेंडरसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला. अजित कुंकुलोळ यांच्या हृदयातून आलेली ही संकल्पना पाहता पाहता ऑक्सिजन या मुद्द्यामुळे उपचारापासून वंचित राहण्याची धास्ती बसलेल्या.अनेक कुटुंबांसाठी “जादूची झप्पी” ठरली.
आज ऑक्सिजन सिलेंडर बँकेचे उद्घघाटन कोव्हीड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळींच्या हस्ते करण्यात आले, राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासत आहे कोव्हीड रुग्ण झपाट्याने वाढत आहेत बार्शीतील डॉक्टर मंडळी अहोरात्र काम करतायेत त्यांचा ऑक्सिजन उपलब्ध करण्यावर बराच वेळ जात होता. मातृभूमी ऑक्सिजन सिलेंडर बँकेच्या माध्यमातून अजित कुंकुलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन सिलेंडर डेपो सुरु केला आहे सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे प्रतिष्ठानचे संचालक तथा उद्योजक .कमलेश मेहता यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे
आजपासून रुग्णांना ऑक्सिजन कमी पडणार नाही याची दक्षता मातृभूमी घेणार असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांनी सांगितले, .र्डॉ.योगेश सोमाणी,डॉ.लक्ष्मीकांत काबरा, डॉ.प्रकाश बुरगुटे, डॉ. गणेशकुमार सातपुते, डॉ. विक्रांत शहा,डॉ.मिलिंद चौधरी, डॉ.संजय अंधारे, डॉ.योगेश कुलकर्णी, डॉ.रामचंद्र जगताप व बन्सीधर शुक्ला यांच्यासह प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे,विनय संघवी,गौतम कांकरिया, मुरलीधर चव्हाण,अजित कुंकुलोळ,मधुकर डोईफोडे,अशोक हेड्डा,किरण गाढवे,रावसाहेब यादव,अशोक इनामदार, शहाजी फुरडे,उमेश डोईफोडे यांच्या साक्षीने या प्रकल्पाचा श्रीगणेशा झाला. आभार प्रदर्शन विनय संघवी यांनी केले.

राजा माने,अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र व
संस्थापक संचालक, मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी.