Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शीत बालरोग तज्ञांच्या मदतीने ५०० बेडचे बाल कोवीड हेल्थ सेंटर व बाल डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प – आमदार राजेंद्र राऊत

बार्शीत बालरोग तज्ञांच्या मदतीने ५०० बेडचे बाल कोवीड हेल्थ सेंटर व बाल डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प – आमदार राजेंद्र राऊत

मित्राला शेअर करा

कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भारतात कोरोनाची तिसरी लाट जुलै ते ऑगस्ट दरम्यान येईल व या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते असेही तज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे.

भविष्यातील कोरोनाच्या लाटेचा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ञ यांची तातडीची बैठक आज शनिवार दि. १५ मे रोजी नगरपरिषदेत घेतली. या बैठकीत सर्वांशी सल्लामसलत करून, चर्चा करून,त्यांचे मार्गदर्शन घेऊन,एकमेकांच्या सोबतीने बार्शी शहर व तालुक्यासाठी लवकरच बार्शी शहरात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, देशाची भविष्य असलेली बालके व तरुण पिढीच्या संरक्षणासाठी, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणा, बालरोग तज्ञ व इतर यंत्रणेसोबत एकमेकांच्या सहकार्याने सज्ज झालेलो आहोत. या लाटेचा सामना करण्यासाठीच ही आढावा बैठक घेऊन लाटेची पूर्व तयारी चालवली आहे.

बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांच्या बाल कोवीड सेंटर उभारणीच्या आवाहनाला सकारात्मकपणे तयारी दर्शवून होकार दिल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने सर्व बालरोग तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.तसेच या बाल कोवीड सेंटर उभारणीकरिता शासन पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही अभिवचन त्यांनी दिले.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने साहेब, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे पाटील मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ढगे,ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सौ. शितल बोपलकर मॅडम, डॉ. जयवंत गुंड,जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉ. बी. वाय. यादव,बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी,डॉ. सुनील पाटील,डॉ प्रशांत मोहिरे, डॉ. हरीश कुलकर्णी, डॉ. अमित लाड,डॉ.आनंद मोरे,डॉ. जितेंद्र तळेकर,डॉ.अबिद पटेल, डॉ. विजयसिंह भातलवंडे,डॉ. सौ. स्वाती भातलवंडे,डॉ.युवराज रेवडकर,डॉ.सौ. रोहिणी कोकाटे,डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.