Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शीतील आत्महत्येचे सत्र सुरूच विलगिकरण कक्षात कोरोना रुग्णाची आत्महत्या

बार्शीतील आत्महत्येचे सत्र सुरूच विलगिकरण कक्षात कोरोना रुग्णाची आत्महत्या

मित्राला शेअर करा

बार्शी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका व्यक्तिने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.आत्महत्या केलेली व्यक्ती चिखर्डे या गावची असून नाव उमेश भागवत कोंढारे वय-३७ वर्षे आहे. काही दिवसांपूर्वी कोंढारे आणि त्यांच्या कुटुंबातील आई,पत्नी आणि दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना बार्शीतील पॉलिटेक्निक येथे असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

उमेश यांनी आज पहाटे फाशी घेतल्याचे तेथील स्टाफच्या निदर्शनास आल्यानंतर तेथील स्टाफने बार्शी पोलिस स्टेशनला कळविले. अद्याप फाशीचे खरे कारण समोर आलेले नाही.
बार्शी तालुक्यातील व शहरातील आत्महत्यांचे प्रमाण ही खुपच गंभीर बाब बनली आहे.