
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण सर्वाना माहिती आहे ही म्हण कोरोना सत्य करून दाखवत आहे.
तुळजापूर मध्ये कोरोना संकट काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे . मृत कोरोनाबाधीत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने ५ हजारांची लाच घेऊन भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे हे खरच दुर्दैवी म्हणावे लागेल.एकीकडे संपूर्ण यंत्रणा लोक कोरोनाशी लढा देत असताना काही मंडळी मात्र या संकटाचा व रुग्णांच्या मजबुरीचा आर्थिक फायदा घेत आहेत
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगर परिषदेतील ही घटना असून बामणी या गावातील एका मयत रुग्णाच्या नातेवाईककडून अंत्यसंस्कार लवकर करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेचे कर्मचारी शंकर कांबळे यांनी ५ हजार रुपयांची लाच घेतली . या घटनेची माहिती कळताच व नातेवाईक यांच्याकडून खातरजमा केल्यानंतर तुळजापूर मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी तात्काळ कांबळे याना निलंबन करण्याचे आदेश दिले असून त्यांना निलंबित केले आहे . शुक्रवारी तुळजापूर येथे १३ मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले . तुळजापूर नगर परिषद ही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या प्रभावीपणे राबवित असुन कांबळे यांनी केलेला प्रकार दुर्दैवीआहे.नागरिकांनी काळजी .घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे .
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार