मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे लाइव्ह द्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्रदिन आणि कामगारदिन च्या शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या सर्व शहिदांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार. यासाठी असून त्यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी आहे.मात्र या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोस मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची सांगितले.
उद्या १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्यातयेणारआहे. या वयोगटातील ६ कोटी नागरिकांना २ डोस प्रमाणे १२ कोटी लसींची आवश्यकता आहे. मात्र, राज्याला उपलब्ध होणारी लस मर्यादित असल्याने थेट लस केंद्रावर गर्दी करू नये. लस केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या थोपविण्यासाठी कडक निर्बंधांची आवश्यकता असून. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. भवितव्यात येऊ शकणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून याचा फायदा तिसर्या लाटेत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले
प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्याची आणि ते कोविन ॲपला जोडण्याची किंवा राज्यांना त्यांचे ॲप तयार करू देऊन ते कोविन ॲपला जोडण्याची मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.
कडक निर्बंधानंतर लगेचच रुग्ण संख्या कमी झाली नसली तरी मागील काही दिवसांपासून ती स्थिरावण्यास मदत होतआहे. राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ झालीआहे. राज्यात १७०० मे.टन ऑक्सिजनचे नियोजन करण्यातआलेअसून. जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजची राज्यात तातडीने अंमलबजावणी सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लाइव्ह च्या माध्यमातून दिली.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद