महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी 2780 कोटी मंजूर
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी मोठी घोषणा केली . महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांसाठी 2780 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला . महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुनर्बाधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात गडकरींनी माहिती दिली . दरम्यान , या निधीमुळे राज्यातील विकास कामांना गती मिळणार आहे .
मंजूर निधी
जळगाव-भद्रावन-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड रोडचे पुनर्वसन व अपग्रेडेशन 222 कोटी
गुहार-चिपळूण रोडच्या विभागाच्या श्रेणीसुधारणा 171 कोटी
गडचिरोली जिल्ह्यातील श्रेणीकरण व छोटे व मोठे पूल बांधण्यास 282 कोटी
वातूर ते चारठाणा विभागातील दोन लेनचे पुनर्वसन व अपग्रेडेशन 228 कोटी
तिरोरा-गोंदियाच्या विभागाच्या श्रेणीसुधारणास 282 कोटी
तिरोरा-गोंदिया राज्य महामार्गाच्या भागाच्या श्रेणीसुधारणास 288.13 कोटी
नागपूर आरटीओ चौक ते नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे उड्डाणपूल आणि एनएच 53 वर वाडी / एमआयडीसी जंक्शन येथे 4 लेन उड्डाणपूल बांधण्यास 478.83 कोटी
नांदेड जिल्ह्यातील येसेगी गावाजवळ मांजरा नदीच्या पूल बांधण्याच्या कामास 188.69 कोटी
परळी ते गंगाखेड या कामाचे सुधार व पुनर्वसन करण्यास 224.44 कोटी
गगनबावडा – कोल्हापूर विभागाच्या श्रेणीसुधारणास 167 कोटी
आमगाव-गोंदिया विभागाच्या श्रेणीसुधारणास 239.24 कोटी
More Stories
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद
जिल्हा मेळावा मध्ये महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश…
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!