Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून इच्छुकांना मिळणार आरोग्य प्रशिक्षण

मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून इच्छुकांना मिळणार आरोग्य प्रशिक्षण

मित्राला शेअर करा

सोलापूर,दि.१: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ही कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम आणला आहे.यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्याचे मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार होणार आहे. दवाखान्यांनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवावा,असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. त्यांना ऑन दि जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सहभागी होण्यासाठी दवाखान्यांनी https://forms.gle/utac2jv5nKjJq1SX7 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था नोंदणीसाठी आपली इच्छुकता नोंदवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय शिक्षण संस्था, १२ बेडपेक्षा अधिकची सोय असणारे खाजगी दवाखाने या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था (व्हीआयटी) म्हणून सूचिबद्ध होऊन प्रशिक्षण देण्यास पात्र ठरणार आहेत.सूचिबद्ध प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणासाठी टप्पेनिहाय प्रशिक्षण शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अदा करणार आहे.

जिल्ह्यातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील मोफत प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://forms.gle/NppJHa48WwArbLQj8 या लिंकवर उपलब्ध गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती भरावी.प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क असणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर,दूरध्वनी क्र.0217-2622113/2722116 यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.