Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > लोकसभेचे उट्टे काढल्याशिवाय गप्प बसणार नाही; अकलूजकारांवर निशाणा

लोकसभेचे उट्टे काढल्याशिवाय गप्प बसणार नाही; अकलूजकारांवर निशाणा

मित्राला शेअर करा

सोलापूर: जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा आ. शिंदे विरुद्ध मोहिते पाटील असा राजकिय सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे. पंढरपुरात झालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचार सभेत आमदार.संजय शिंदे
काय बोलणार याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते
ज्यांनी ज्यांनी मला लोकसभेला पडण्याचे काम केले त्यांचे उट्टे काढण्यासाठीच मी आज इथे आलोय मला नानांनी मदत केलेली आहे त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली हे देखील ते बोलायला ते विसरले नाहीत.

लोकसभेच्यावेळी मोहिते पाटील भाजपात गेले, अन लोकसभेचे तिकीट संजयमामांच्या गळ्यात पडले परंतु त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले हा पराभव संजय शिंदेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची खदखद आजही त्यांच्या मनामध्ये असल्याचे कालच्या तिखट भाषणावरून पहायला मिळाले.