
रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे.
रेमडेसिवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करेल.
मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचे उत्पादन झाल्यास हजारो लोकांचे प्राण वाचतील, या कामी डॉ. क्षीरसागर आणि त्यांच्या टीमला यश मिळावे यासाठी गडकरी दांपत्याने श्री क्षीरसागर यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून वर्ध्यातील ‘जेनेटिक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे आभार मानले.
More Stories
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम