Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > विठ्ठल भक्ताने दिले एक कोटीचं गुप्त दान

विठ्ठल भक्ताने दिले एक कोटीचं गुप्त दान

मित्राला शेअर करा

कोरोनाने आजाराने बळी घेतलेल्या पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका पत्नीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तब्बल एक कोटीचे दान दिले आहे.विठ्ठल मंदिर देवस्थानच्या इतिहासात ही मंदिराला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.मुंबईतील या भक्त असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी कोरोनाने निधन झाले असून पतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे दान दिले आहे. विठ्ठलभक्त पतीच्या निधनानंतर पत्नीने 1 कोटीची देणगी देत इच्छा पूर्ण केली.


शहरात आषाढी यात्रेची संचारबंदी संपल्यावर आठ दिवसांपूर्वी ही महिला आपली मुलगी आणि सासूला घेऊन विठ्ठल मंदिरात पोहचली.आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणे विठुरायाच्या चरणी गुप्तदान देण्याचे तिने मंदिर प्रशासनाला सांगितले.माझ्या पतीचे निधन झाले असून पतीच्या इच्छेनुसार आपण एक कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती बाहेर आल्यास आपल्या कुटुंबाला त्रास होऊ शकेल.
त्यामुळे आपले अथवा आपल्या दिवंगत पतीचे नाव आणि देणगी रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती या विधवा पत्नीने केली होती.त्यानुसार मंदिराकडून गेल्या आठ दिवसांत याबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नव्हती.परंतु आता मंदिर प्रशासनाने या १ कोटीच्या देणगीबाबत दुजोरा दिला असून १० लाखाचे १० चेक मंदिर प्रशासनास सुपूर्द केले आहेत.