Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र आणि धीरज नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर संपन्न

विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र आणि धीरज नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर संपन्न

मित्राला शेअर करा

आम्ही सर्व रुग्णसेवक ही भावना समोर ठेऊन कार्य करणाऱ्या
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र आणि धीरज नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विठ्ठल रखुमाई मंदिर, पिंप्रीराजा गाव, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राज्यातील रक्ताचा तुटवाडा व मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री महाराष्ट्र यांच्या रक्तदान करण्याच्या आव्हानाला साथ देत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्षा सौ. छायाताई भगत आणि प्रदेश संपर्कप्रमुख श्री. रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित केले होते.
ह्या कोरोनाच्या कठीण काळात समितीच्या युवा पदाधिकारी संभाजीनगर युवती जिल्हासमन्वयक कु. राधा लाटे पाटील आणि संभाजीनगर तालुका युवक संपर्कप्रमुख कु. प्रतिक गावंडे यांनी आपला वेळ वाया न घालवता सामाजिक व आरोग्य सेवा करत ३० रक्तदात्यांचे शिबीर घेतले.
रक्तदान करणाऱ्या सर्व ३० रक्तदात्यांचे, ग्रामस्थ मंडळ पिंप्रीराजा तसेच रक्त संकलन करण्यासाठी विशेष आभार लोकमान्य ब्लड बँक औरंगाबाद यांचे विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र यांच्या वतीने आभार म्हणण्यात आले.