Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सचिन वायकुळे लिखित पत्रकारिता शोध व बोध पुस्तक नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल:मा.मं.दिलीप सोपल

सचिन वायकुळे लिखित पत्रकारिता शोध व बोध पुस्तक नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल:मा.मं.दिलीप सोपल

मित्राला शेअर करा

बार्शी : दैनिक संचारचे उपसंपादक,बार्शीचे सुपुत्र सचिन वायकुळे यांनी लिहिलेल्या पत्रकारिता शोध व बोध हे पुस्तक नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल असे विचार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.

आनंदयात्री प्रतिष्ठाणच्या वतीने व विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकारातून कासारवाडी रोड येथील लक्ष्मीविहार येथे आयोजित पत्रकारांशी गप्पा टप्पा व चहा-पान या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पत्रकार सचिन वायकुळे लिखित पत्रकार शोध व बोध या पुस्तकाचे वाटप सर्व पत्रकारांना करण्यात आले.

पुढे बोलताना सोपल म्हणाले आज पत्रकारितेत प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया असे तीन प्रवाह झाले आहेत.परंतु वाचकांनी तीनही प्रवाहांना तितकेच महत्व दिलेले आहे.त्यामुळे पत्रकारांनी देखील लोकमताचा विचार करून,लोकांना काय पाहिजे,लोकांचे नेमके मत काय आहे असेच लिखाण करणे गरजेचे आहे.

हा स्नेहमेळावा सर्व पत्रकारांना एकत्र आणण्याचा आणि त्यातूनच गप्पा टप्पा मारत आनंद घेण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते असे विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे म्हणाले.

या कार्यक्रमात कु. श्रद्धा रविंद्र शिंदे हिने शाहू कॉलेजने घेतलेल्या परिक्षात बार्शीमधून तीने नंबर पटकाविल्याने तीचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल,विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे,जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे,संतोष सुर्यवंशी,मयूर गलांडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी प्रा.रामचंद्र इकारे सर यांनी केले तर प्रशांत घोडके यांनी आभार मानले.यावेळी आनंदयात्री प्रतिष्ठाणचे सदस्य देखील उपस्थित होते.