Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब जेवे यांची निवड

सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब जेवे यांची निवड

मित्राला शेअर करा

दिनांक १जुलै रोजी ग्राम प्रति निष्ठा इति ग्रामपरिषदस्य प्रतिष्ठा हे धोरण समोर ठेऊन कार्य करणारी सरपंच परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यस्तरीय प्रथम विस्तार मेळाव्याचे आयोजन उस्मानाबाद मधील यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी करण्यात आले
या कार्यक्रमामध्ये सरपंच संघटना पुणे,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांचा निवडी करण्यात आल्या.

उस्मानाबाद,सरपंच परिषद पुणे,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी श्री बाळासाहेब जेवे यांची निवड करण्यातआली या वेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

बाळासाहेब जेवे हे वडगाव(जहागीर)ता.कळंब जि. उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत व सरपंच पद राखीव महिला श्रीमती वाघमारे सरलाबाई सरपंच,उपसरपंच, ऍड.सौ.ज्योती मुंढे,याच्यासह सात सदस्य आहेत.

ग्रामपंचायत सदस्य जेवे हे उच्च शिक्षित असून महाराष्ट्र संत विद्यालय तेर या प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळ सदस्य म्हणून काम केले आहे,केंद सरकारची अटल लॅब विज्ञान प्रयोगशाळा मान्यता, राज्यशासनाचे विविध योजना संदर्भात माहिती देणारे लोकराज्य मासिक विद्यार्थ्यां मार्फत ग्रामीण भागातील पालकांपर्यंत पोहोचवून तसेच या माध्यमातून विविध शासकीय योजनांसंधर्भातील माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले तसेच शाळा सुधारणा व गुणवत्ता सुधारण्यासाठी ही अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले

काळासोबत चालले पाहिजे हे ध्यानात घेऊन संगणकाचे ही उत्कृष्ट ज्ञान संपादन केले
आज ग्रामीण भागातील उच्चशिक्षित लोकांनी ही राजकारणात सहभाग घेणे गरजेचे आहे जेणेकरून शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचतील
.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब चे आमदार कैलास पाटील, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,मा. जि.प.अध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील,राजलक्ष्मी फाऊंडेशन महाराष्ट्र चे संस्थापक सचिव प्रतापसिंह पाटील प्रसिद्ध उद्योगपती प्रविण रणबागुल मा.श्री. प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पायाळ,सौ.जिनत सय्यद प्रदेशाध्यक्ष महिला,शंकर ( बापु ) खापे मार्गदर्शक, सुशील तौर सहसचिव,संदीप देशमुख राज्य कार्यकारीणी सदस्य,मंदाकिनी सावंत प्रदेश सचिव,राम पाटील कोषाध्यक्ष,कोहीनूर सय्यद राज्य कार्यकारीणी सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.