श्री.यशवंत निकवाडे हे धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी आश्रमशाळा वर्शी ता शिंदखेडा येथे इंग्रजी विषयाचे नामवंत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आश्रमशाळेत काम करत असतांना त्यांनी आपल्या नवोपक्रमांचा माध्यमातून अनेकांची मने जिंकली.कोरोना काळात यशवंत निकवाडे यांनी कुठलीही विश्रांती न घेता,न थकता आपले काम चालूच ठेवले.या काळात त्यांनी 400 पेक्षा जास्त स्केचेस काढून एक नवीन विक्रम केला.त्यांचे हे सर्व स्केचेस समाज प्रबोधन व चांगला संदेश दणारे होते.त्यांच्या ह्या स्केचेसना राज्यभरातून खूप प्रसिद्धी मिळाली.त्यांची चित्रे खूप चर्चेत राहिली.श्री.यशवंत निकवाडे हे एक इंग्रजी विषयाचे नामवंत शिक्षक असून ते एक कवी,लेखक, चित्रकार,सूत्रसंचालक, व्याख्याते आहेत.त्यांनी ह्या लाॅकडाऊन काळात अनेक समाजप्रबोधन करणारे लेख लिहून अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध केले आहेत.त्यांनी ह्याच काळात खूप छान,सुंदर,जनजागृती करणाऱ्या कविता पण लिहल्या.त्यांचे लेख व कवितांनी,लोकांचे मन वेधून घेतले. ते एक व्याख्येते पण आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. परीसरात एक नामवंत सूत्रसंचालक म्हणून ते ओळखले जातात.त्यांचे सूत्रसंचालन ऐकणे हे श्रोत्यासाठी एक पर्वणीच असते.
हे सर्व करत असतांना आपण समाजाचे सुद्धा काही देण लागतो या भावनेतून समाज सेवा करायचे ते कधीच विसरले नाहीत त्यांनी ह्याच काळात,गरीबांना अन्नधान्य, कपडे,चादरी,रोख रक्कम, जेवन पाणी,तसेच ऑक्सिजन सिलेंडर पण आपल्या स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहे.
सरांनी आतापर्यंत चार पुस्तके लिहली असून 40 पेक्षा जास्त पुरस्काराने ते सन्मानीत झाले आहेत. नुकतेच आदिवासी विभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘शिक्षण सेतू अभियान “राबविण्या करीता ते सातपुडा डोंगरात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना अद्यापण करण्यासाठी पाड्यावर जावून अद्यापण करत आहेत.
याच सोबत विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासाचा विचार करता प्रभावी व रूबाबदार राहणीमान कसे असावे हे ही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
श्री.यशवंत निकवाडे यांनी राबविलेल्या या नवोपक्रमामुळे त्यांचे नाव राज्यभर चर्चीले जातअसून ते खरच इतरांनासाठी एक प्रेरणास्थान आहेत.म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
More Stories
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन