Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सेतू अभ्यासक्रम राबवत असताना गांभीर बाब समोर विद्यार्थ्यांमधील लिखाणाची सवय मोडतेय

सेतू अभ्यासक्रम राबवत असताना गांभीर बाब समोर विद्यार्थ्यांमधील लिखाणाची सवय मोडतेय

मित्राला शेअर करा

सेतू अभ्यासक्रम (Bridge Course ) च्या चाचणी परीक्षेस आज सुरवात झाली
कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत.शाळा बंद पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे,याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत
आहेत

मात्र सेतू अभ्यासक्रम राबवत असताना गांभीर चित्र समोर येत आहे बर्‍याच विद्यार्थ्यांमधील लिखाणाची सवय मोडल्याचे दिसून येत आहे.

याच बरोबर काही शाळांनी सेतू अभ्यासक्रम उशिरा राबवला त्यामुळे एकदम लिखाणाचा बोजा विद्यार्थ्यांवर पडत आहे असा सूर पालकांशी चर्चा केल्यानंतर दिसून आला.
आहेत.
शहरासोबत ग्रामीण भागात ही सेमी इंग्रजी माध्यम घेण्याकडे पालकांचा कल मोठय़ाप्रमाणात वाढलेला आहे व
सेमी इंग्रजी माध्यमाचे pdf साहित्य उपलब्ध झालेले नाही याचा ही विचार झालेला नाही
तर ग्रामीण भागातील संदर्भात येणार्‍या अडचणी वेगळ्याच आहेत खेड्यातील शिक्षकांबरोबर चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाईल संदर्भात अडचणी आहेत त्यामुळे मागील वर्षी

सेतू अभ्यास मागील वर्षी क्षमता व अभ्यासक्रम आधारित आहे परंतु शाळांनी मागील वर्षीची पुस्तके जमा करून घेतली आहेत त्या शिवाय नवीन पुस्तके दिली जात नाहीत.


यामध्ये सर्वच विद्याथ्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.त्यामुळे मागील वर्षांतील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यस्तरावरून सर्वच विद्याथ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.

इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी,गणित , इंग्रजी,विज्ञान हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयासाठी ४५ दिवसाचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे . सदर सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील क्षमतांवर आधारित आहे.हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करावयाचा आहे.सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका ( worksheets ) देण्यात आल्या असून सदर कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील असे त्यांचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका सोडवायच्या आहेत. विषयनिहाय स्वतंत्र वहीमध्ये किंवा शक्य असल्यास त्याची छपाई करून सोडवायच्या आहेत व शिक्षकांनी अंतर्गत मूल्यमापनासाठी त्यांचा उपयोग करावयाचा आहे.

सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे . शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या चाचण्यांच्या गुणाची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.