Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > ही माणूस बनण्याची वेळ आहे, हैवान नाही

ही माणूस बनण्याची वेळ आहे, हैवान नाही

मित्राला शेअर करा

अअसताना.कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असताना.काही गोष्टी बघून, वाचून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.काही ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट तयार करून अव्वाच्या सव्वा भावात विकले जात आहे.या इंजेक्शनच्या मोठ्याप्रमाणात काळा बाजार होताना दिसत आहेत.लाॅकडाऊन मुळे लोक घरातच आहेत.उत्पन्नाचे मार्ग बंद पडलेले आहेत.हातात पैसे नाहित.उरले सुरले पैसेपण संपले,अशातच सर्वच नाही पण काही डाॅक्टर पैसे कमावण्यासाठी लागलेले आहेत.रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल वसूल केली जात आहेत. धुळ्यातील एका दवाखान्यात तर मेलेल्या रूग्नाच्या खिशातून पैसे चोरतांना काही दवाखान्यातील कर्मचारी cctvत पकडले गेले.मानवता मरतांना दिसत आहे.माणूस माणसासारखा वागताना दिसत नाही.कुणालाही कुणाची पडलेली नाही.बोटावर मोजता येणारे सोडले तर राज्यकर्ते राजकारण करताना दिसत आहेत. दिवसाला अनेकांचा घरातले कर्ते पुरूष जगाला सोडून जात आहे.अशा भयावह परीस्थिती मध्ये मृतांच्या नातेवाईकांना आधार देणे,संकटात सापडलेल्यांना मदत करणे.दोन शब्द गोड बोलणे,याची खरी गरज असताना माणसातली माणूसकी संपली कि काय अस वाटायला लागल.आता माणूस बनण्याची वेळ आलेली आहे.आधी माणूस व्हा.एकमेकाना आधार द्या आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा.आपण केलेले हेच छोटे कार्य आपण गेल्यानंतर शिल्लक राहणार आहे.एका कवीने खूप छान म्हटले आहे–

जन पळभर म्हणतील हाय हाय ।
मी जाता राहिल कार्य काय ।

लोकांच्या दुखांत फुंकर घालण्याची गरज आहे.आधार देण्याची गरज आहे.मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे.प्रेमाची दोन शब्द बोलण्याची गरज आहे.हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण माणूस होणार.आपल्या सर्वांना आधी माणूस होण्याची गरज आहे.
एक मोठा नेता फोनवर बोलत होता. त्याच्याजवळ एक गरीब माणूस आला.त्याला खूप तहान लागलेली होती.त्या गरीबाने ह्या मोठ्या माणसा कडे पाणी मागितले,तो माणूस म्हणाला,घरात माणूस नाही आहे.एवढे सांगून पुन्हा फोनवर बोलायला लागला. पुन्हा गरीबाने त्याच्याकडे पाण्यासाठी विनवणी केली. तो पुन्हा म्हणाला.घरात माणूस नाही पुन्हा फोनवर बोलायला लागला.तो मनातल्यामनात म्हणायला लागला.मला एवढी तहान लागलेली आहे.आणी हा म्हणतो घरात माणूस नाही.फोन बाजूला ठेवून आधी तु स्वतः माणूस हो ना!
त्या गरीबाला तिथ पाणी काही भेटलं नाही.

तात्पर्य हेच कि आज आपल्याला अगोदर माणूस होण खूप गरजेचे आहे.आधी माणूस व्हा !

ना हिंदू बन,ना मुसलमान बन।
इंसान कि औलाद है,पहले तु इंसान बन।

शब्दांकन -श्री.यशवंत निकवाडे,धुळे