वाशिम / मानोरा तालुक्यातील माहुली येथील वृक्षप्रेमी प्राणिमित्र म्हणून ओळख असलेला निखील चव्हाण हा निसर्ग जपण्याचा वारसा युवांपर्यंत पोहोचवत आहे.यासाठी निखील परिचयांच्या तसेच मित्रमंडळी नातेवाईकांच्या वाढदिवसाची आवर्जून वाट पाहतो.वाढदिवसाचे औचित्य साधून निसर्गाचा वारसा जपतो.गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिगडत आहे. परिणामी निसर्गातील चिमण्यांसह काही जीवसृष्टी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे परिणामी निसर्गाचा समतोल बिघडल्याने अनियमीत पावसासह अन्य नैसर्गिक संकटांचा करावा लागत असल्याचे निखील चव्हाण याच्या लक्षात आले त्यासाठी वृक्षारोपण, पक्षांसाठी पाणपोई असे उपक्रम निखीलने सुरू केले निसर्गाचा वारसा जपा, असा उपदेश केल्यावर कोणीही गांभीर्याने दखल घेणार नाही,म्हणून निखीलने युक्ती
लढवली.स्वतःचा, मित्रमंडळींचा नातेवाईकांचा,लग्न वाढदिवस पदोन्नती, नोकरीसाठी नियुक्ती आदी आनंदाच्या क्षणाची निवड केली.प्रसंगी संबंधितांना शुभेच्छांच्या स्वरूपात त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण, पक्षांसाठी पाणपोई लावू लागला.निखीलकडून अशा प्रकारे मिळणाऱ्या शुभेच्छांमुळे हे अनेकांसाठी अविस्मरणीय ठरले त्यामुळे इतर लोकही निखीलच्या निसर्ग वारसा जपण्याच्या उपक्रमाचे अनुकरण करू लागले . काही दिवसांपूर्वी निखीलने तब्बल अठराशे सिडबॉल तयार केले यातील काही सिडबॉल गावातील व इतर वृक्षमित्रांना भेटीच्या स्वरूपात दिले पाचशे ते सहासे सिडस बॉलची माहुली परिसरात व आजूबाजूच्या डोंगराळ भागात निखीलने लागवड केली इतरांसाठी आदर्श ठरलेला निखील सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत . वेळात वेळ काढून निखील निसर्ग जोपासण्याचा छंद जोपासत असतो याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ११ मार्च रोजी स्वतःच्याच वाढदिवसादिनी निखीलने पक्षांसाठी पन्नास पाणपोई व अन्नाची सोय करुन अनोख्यारीतीने वाढदिवस साजरा केला.तसेच अंगी असलेली सिड्स बॉल तयार करण्याची कला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी निखीलने गावातील युवकांसाठी सिडबॉल कार्यशाळा राबवली यासंकल्पनेची दाखलअनेक टीव्ही चॅनेलने देखीलघेतलीआहे.या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेकांना सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण लाभले.तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी कसा हातभार लावता येईल यावर भर देत प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावे,असे आवाहन निखील चव्हाण शुभेच्छा देताना आवर्जून सर्वांना करतो .
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद