
अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची लढाई मोहिते पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिंकली आहे. गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाला फळ आले आहे.परंतु शासनाचा प्रत्यक्षात आदेश मिळेपर्यंत उपोषण न संपविण्याचा आंदोलन कर्त्यांचा विचार आहे अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीचा अंतिम अध्यादेश तीन आठवड्यात काढून त्याबाबत कळवावे,असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.मात्र आदेश मिळेपर्यंत उपोषण सुरू रहाणार आहे
अकलूज येथे नगरपरिषद,तर नातेपुते येथे नगरपंचायत होणार, हे आता निश्चित झाले आहे.

दरम्यान,अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर नगरपरिषदेसाठी गेल्या २६ दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे.या उपोषणस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार प्रशांत परिचारक,आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाजपच्या नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शविली होती.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर