श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन महाराष्ट्र विद्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊसाहेब , सावित्रीबाई फुले व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सौ मीनाक्षी पाटील(संस्था सदस्य श्री.शि.शि.प्र.मंडळ बार्शी), सौ वैशाली शितोळे व डॉ.गुलाबराव पाटील (संस्था सदस्य व ट्रसटी) हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयकुमार शितोळे (चेअरमन सांस्कृतिक विभाग) म्हणून लाभले सोबत विद्यालयाचे प्राचार्य श्री.डी.बी. पाटील,उपप्राचार्य श्री.एल.डी. काळे,पर्यवेक्षक जी.ए.चव्हाण,
सत्कारमूर्ती मुख्याध्यापक श्रीमती ठोंबरे मॅडम ,प्रा.किरण गाढवे, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्रीमती ठोंबरे मॅडम यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्कारमूर्ती चा परिचय श्रीमती गव्हाणे मॅडम दिला.त्यांनतर श्रीमती ठोंबरे मॅडम यांनी आपले सत्कार ला उत्तर दिले. यांनतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या सोबत महीलांनी आपले आरोग्य कसे जपावे सांगितले.यानंतर डॉ.मीनाक्षी पाटील व सौ वैशाली शितोळे यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सुगंधी गजरा व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयातील श्रीमती शिंदे एस.एल व श्रीमती पवार एस.एस महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कातळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील एन.एस. मॅडम यांनी केले.
More Stories
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल
लोकनृत्य स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवीच्या मुली प्रथम