Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर

आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिले 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर

मित्राला शेअर करा

अकलूज:माळशिरस तालुक्यात चालू आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्ये वाढू लागली आसल्यामुळे व तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेवून विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून अकलूज येथील उपजिल्हा रूग्णालयासाठी 13 ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर आज भेट दिले आहेत.


त्याचा लोकार्पण सोहळा उपजिल्हा रूग्णाल्यात आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रेणीक शहा,डाॅ.संतोष खडतरे,डाॅ.मुकुंद जामदार,डाॅ.मनीषा कदम,डाॅ.सुप्रिया खडतरे,डाॅ.निखिल मिसाळ व रूग्णालयातील कर्मचारी वर्ग,नागरीक उपस्थित होते.