टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वतःवर विश्वास असणं आवश्यक असतं. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही सोबत असतात. यात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होतोय.
नीरज चोप्राला हरियाणा सरकारनं 6 कोटी रुपयांसह क्लास वन अधिकारी पदावर सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारकडून देखील नीरज चोप्राला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सोबतच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने नीरजचं कौतुक करत एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईनं देखील एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला नवीन लॉन्च होत असलेली एक्सयूवी 700 गिफ्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये तब्बल 13 वर्षानंतर सुवर्ण पदक
ऑलिम्पिकमध्ये भारतातसाठी हे दुसरं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. या आधी 13 वर्षांपूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्याआधी भारताने हॉकीमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकले आहेत.
याच सोबत इतरही पदक विजेत्यांना ही मोठया प्रमाणात बक्षीस तसेच शासकीय नोकरीमध्ये सुद्धा अधिकारी पदावर नेमणुका करण्यात आल्या आहेत.
More Stories
बॅडमिंटन स्पर्धेत बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीचा संघ प्रथम
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान