Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कर्नाटकात शहाजी राजे यांच्या समाधी स्थळी पुतळा उभारणार

कर्नाटकात शहाजी राजे यांच्या समाधी स्थळी पुतळा उभारणार

मित्राला शेअर करा

कर्नाटक राज्यात शहाजी राजे यांची समाधी असून तेथे महाराष्ट्र शासनामार्फत त्यांचा पुतळा उभारता येईल हे पाहण्यासाठी पुरातत्व संचालकांनी स्वत:तेथे जाऊन त्या जागेची पाहणी करावी असे निर्देश पुरातत्व संचालकांना दिले आहेत

कुठे आहे शहाजी महारांची समाधी-

शहाजी राजे राजे यांची समाधी दावणगेरे जिल्ह्यात चन्नगेरी तालुक्यातील होडीगेरे या गावच्या उत्तरेस आहे.कर्नाटक सरकारनेही समाधि स्थळाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊन परिसर सुधारणा केली आहे.
होदिगेरे येथे शिकारीस गेले असता घोड्यावरून पडून ते मरण पावले असा उल्लेख विकिपीडियावर आहे व्यंकोजींनी होदिगेरे येथे त्यांच्या स्मृत्यर्थ वृंदावन बांधले व शिखर शिंगणापूर येथे त्यांच्या स्मृत्यर्थ एक प्रतीकात्मक वृंदावन आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे जतन,संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले,सागरी किल्ले,राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनासंदर्भात मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे,पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राचे असे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे.या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका यापूर्वीच केल्या आहेत.राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात यावी, असे निर्देश श्री.देशमुख यांनी यावेळी दिले.आज पुराभिलेख संचालनालयाकडे ऐतिहासिक वारसा आहे.हा वारसा जतन करीत असताना डिजिटल स्वरुपात हा वारसा जतन करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.