Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > काळ आधार देण्याचा …गम्मत बघण्याच्या नाही

काळ आधार देण्याचा …गम्मत बघण्याच्या नाही

मित्राला शेअर करा

कोरोनामुळे परीस्थिती गंभीर झालेली आहे.परिवारातील अनेक कर्ते पुरूष जग सोडून जात आहेत.अनेकजण दवाखान्यात रुग्णशय्येवर पडून आहेत. कुणाला बेड भेटत नाही कुणाला ऑक्सिजन मिळत नाही.इंजेक्शन साठी पळापळ सुरू आहे.हि सर्व परीस्थिती आपण अनुभवत आहोत. अशा वेळेस आपण माणूसकिचे दर्शन दाखवत आपल्या परीने जी शक्य होईल ती मदत केली पाहिजे.देशातील मोठे उद्योगपती रतन टाटा देवासारखे धावून आले.त्यांनी पहिल्या १५०० कोटी व आता २००० कोटी रू.ची मदत केली.अशा माणसाची निश्चित इतिहासात नोंद घेतली जाईल. आपला देश खूप मोठा आहे.फक्त बोटावर मोजता येतील एवढेच लोक मदत करतांना दिसत आहेत. काही माणसं फक्त दुरून गम्मत बघत आहेत. अशा संकट समयी आपण बाधितांना आधार दिला पाहीजे.आज लोकांना आधाराची खुप गरज आहे.अशा प्रसंगी आपण शांत राहून गम्मत पाहणे योग्य नाही.कर्मयोगींची इतिहासात नोंद होते,गम्मत पाहणाऱ्यांची नाही.
एका जंगलाला भयंकर आग लागली. एक चिमणी आपले अंग ओले करून आग विझवण्याचा प्रयत्न करत होती.कावळा दुरून चिमणीची गम्मत बघत होता.कावळ्याने चिमणीला विचारले तुझा एवढस्या प्रयत्नाने आग कशी विझेल.तेव्हा चिमणीने अतिशय सुंदर उत्तर दिले,माझा छोट्या प्रयत्नाने जंगलाची आग विझेल कि नाही माहीत नाही. पण जेंव्हा इतिहास लिहला जाईल तेव्हा माझ्या कार्याची नोंद घेतली जाईल. दुरून तमाशा पाहणाऱ्यांची नाही
.

तात्पर्य-संकट समयी लोकांना आधाराची गरज आहे.म्हणून गम्मत पाहू नका तुम्हाला जशी मदत शक्य आहे तशी करा

कोयल अपनी कुक से,
पेड अपने फल से,
खेत अपने उपज से,
और इंसान अपने कर्मो से
जाना जाता है।
म्हणून काम करत रहा,लोकांना सहकार्य करा, आधार द्या,गम्मत बघू नका
कारण

बात उन्ही की होती है,

जिनमे कोई बात होती है।

शब्दांकन- श्री.यशवंत निकवाडे