Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना निकष व गुण

कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना निकष व गुण

मित्राला शेअर करा

स्पर्धा नव्हे,ही तर लोकचळवळ … कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना अनेक सामाजिक संस्था,संघटना, सरपंच यांसह अनेक घटकांशी चर्चा करुन ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गाव’ही योजना सुरु केली आहे.या स्पर्धेत सहभागी होऊन राज्यातील गावांनी आपले गाव कोरोनामुक्त करून आरोग्यदायी जीवनाच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री महोदय आणि शासनातर्फे करण्यात आले आहे लोकांच्यामध्ये जनजागरण करून एक लोकचळवळीचे स्वरूप देऊ शकलो तर गावे कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही या साठी शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीनी २० निकष कर्तव्यांची पूर्तता करायची आहे
गुणांकनासाठीचे निकष व कमाल लगुण ग्रामपंचायत स्तरावरील
५ पथकांनी नेमून दिलेली कार्य नियमितपणे कारावयाची आहेत. त्याआधारे ग्रामपंचायतीने खालील निकषांनुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीचे स्वयंमूल्यांकन करुन ते गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे.स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषावर ५० गुणांचे गुणांकन करण्यात येईल .

गुणांकनासाठी निकष व कमाल गुणांकन
१ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येणारआहे.
१ प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक
२ विलगीकरण कक्ष स्थापना व कार्यवाही पथक
३ रुग्णालयांसाठीचे वाहन चालकांचे पथक
४ कोविड हेल्पलाईन पथक ५ लसीकरण

१ कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे
२ विविध पथकाची निर्मिती करणे
३ कोरोनाबाधित कुटुंबाचे सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कारणे गावपातळीवर अंटीजेन टेस्टची सुविधा उपायध करणे
५ बाधित रुग्णांना गोविड कोअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल कारणे
६ लक्षणे दिसणाया व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवणे
७ यासाठी रूग्णांकरीता अल्पदरात वाहनव्यवस्था करणे
८विलगीकरण केंद्रावर गरम पाणी,वीज,स्वच्छता , मास्क , सॅनिटायझर सुविधा उपलब्ध करणे , शौचालयाची नियमित स्वच्छता
९खाजगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सक्रिय सहभाग,लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्मितीसाठी १० आहारविषयक मार्गदर्शन कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित असल्यास पथकातील स्वयंसेवकामार्फत मदत करणे
११ शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्याकडील उत्पादित दूध व भाजीपाला हे स्वयंसेवकामार्फत दूध डेअरी व मार्केटला पोहोच करणे १२ सहकारी संस्था, बचतगट,एनजीओ यांचा सहभाग घेणे
१३ कोरोनाबाधित कुटुंबाचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्याशी नियमित संवाद १४ कोरोनाविरहीत कुटुंबांची नोंद ठेवणे व काळजी घेणे
१५ संबंधित पथकातील स्वयंसेवकामार्फत बाधितांच्या उपचारासाठी व्यवस्था करणे
१६ लसीकारणासाठी मदत करणे,उपलब्य लसीचे शासकीय नियमानुसार योग्य ब
वाटप करणे
१७ लहान बालके,गरोदर महिलांचे सर्वेक्षण करणे
१८ जनजागृतीसाठी प्रभावी उपाययोजना,तंत्रज्ञानाचा वापर
१९ नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तीबाबत योग्य ती खबरदारी घेणे
२० मृत्यूदर कमी असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न २१ पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित
न होण्यासाठी नियमांचे पालन करणे
२२कोरोनामुळे आई – वडीलांचे निधन झालेल्या अनाथ मुला – मुलींचा सांभाळ कारणे
स्पर्धेतील यशस्वी ग्रामपंचायतीना बक्षीस व विकास निधी देण्यात येणार आहे.