ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमाच्या इतर शुल्कांमधील जिमखाना,विविध गुणदर्शन/उपक्रम, कॉलेज मॅगेजीन,संगणक,क्रीडा निधी,वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
More Stories
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
तेर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा