
कोरोना महामारीत ज्या रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आसलेल्या हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतले आणि गरीब रुग्णांची ऐपत नसताना उसनवारी करून कोरोना उपचाराचे बील भरावे लागले यासाठी ओमप्रकाश शेटे साहेबांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली त्यावर कोर्टाने निकाल दिला की अशा योजेनेत बसणार्या गरीब रुग्णांचे बिलाचे पैसे परत द्यावे. यासाठी रुग्णांना लाभ कसा घेता येईल याचे संपुर्ण माहीती,मार्गदर्शन माननिय ओमप्रकाश शेटे साहेबांना समितीच्या संस्थापक छायाताई भगत व प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करण्याच्या मागणीवर शेटे साहेबांचा विश्व जन आरोग्य सेवा समिती चे तब्बल 16 जिल्यातील समितीचे पदाधिकारी, सदस्य, रुग्ण सेवकांना माहीती मार्गदर्शन केले आहे,आता महाराष्ट्रभर यासाठी समितीचे सर्व रुग्ण सेवक गरीब रुग्णांना बील परताव्यासाठी मदत करणार आहेत.
ह्या वेळी सामाजिक क्षेत्रातील बऱ्याच संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. भविष्यात समितिला कसलीही मदत आरोग्य सेवेत लागल्यास सहकार्य करणार असल्याचे ओमप्रकाश शेटे सरांनी सांगितले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ