तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील खाजगी दवाखान्यासमोर एका ६५ वर्षीय कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाचा मृतदेह बेवारस अवस्थेत सुमारे पाच तास उघड्यावर पडून होता त्यामुळे नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते
किणी ता.उस्मानाबाद येथील छगन मेसबा सोनटक्के वय ६५ हे सोमवार दि.३ मे रोजी सकाळी तेर येथील बसस्थानका जवळील एका खाजगी दवाखान्या मध्ये उपचारासाठी आले होते यावेळी या दवाखान्यातील डाॅक्टरानी सोनटक्के यांची तपासणी करून त्यांना शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला यावेळी सोनटक्के हे दवाखान्या बाहेर येत असतानाच सोनटक्के दवाखान्याच्या दरवाज्या समोर कोसळून पडेल यावेळी सोनटक्के यांचा जागेवरच मृत्यू झाला
दरम्यान या घटनेची माहिती ढोकी पोलिसांना देण्यात आली यावेळी पोलीस पंचनाम्यानंतर या रूग्णाची तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खाजगी दवाखान्या समोर रँपीड अँन्टीजन टेस्ट केली त्यात सोनटक्के कोरोना पाँझिटीव्ह आढळून आले विशेष म्हणजे सोनटक्के यांच्या मृत्यूसह कोरोनाच्या टेस्टनंतर तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता त्यामुळे नागरिकांसह नातेवाईकामधून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता यावेळी दोन वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या मदतीने तेर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह कीट मध्ये घातले हा सर्व प्रकार पाच तासांपासून सुरु होता दरम्यान एवढ्यावरच ही मृतदेहाची हेळसांड थांबली नाही यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना साधे वहान सुध्दा लवकर मिळाले नाही
शेवटी तेर ग्रामपंचायतच्या घंटागाडीत हा मृतदेह किणी येथे पाठविण्यात आला तब्बल पाच तासापर्यंत हा किळसवाणा प्रकार चालूच होता शेवटी मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आला यावेळी किणी येथे सोनटक्के यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले विशेष म्हणजे या किळसवाण्या घटनेवरून आरोग्य यंत्रणा , ग्रामपंचायत व इतर प्रशासकीय यंत्रणेचा गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत हे या घटनेवरून दिसून आले आहे.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान