
कोविडचा संसर्ग रोखण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ई-बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख इत्यादी मंत्री उपस्थित होते.
या वेळी निर्बंध लावण्यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढविणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे निर्देश देण्यात आले
आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल. आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील. महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे राजेश टोपे यांनी स्वागत केले
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश