सध्याची परिस्थिती पाहिली तर कोरोनाच्या उल्लेख केल्या शिवाय एक ही बातमी पूर्ण होत नाही.परंतु आम्ही उपयुक्त माहितीच्या माध्यमातून लोकांच्या मानत सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाही महाराष्ट्र दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करुया आणि डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देऊन महाराष्ट्र दिन साजरा करुया.
महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे दरवर्षी १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रीया सुरु असताना राज्य पुनर्रचना आयोनाने मुंबई महाराष्ट्रास देण्यास नकार दिला. त्यामुळे मराठी माणसापासून मुंबई तोडली जाण्याची चीड सहन न झाल्याने मोठे जनआंदोलन उभे राहिले व परिणामी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात जमला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊ लागला. हा मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, मात्र मोर्चा पागत नसल्याचे लक्षात येताच तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात १०६ आंदोलकांना हौतात्म आलं. या बलिदानामुळे अखेर सरकारने १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
त्याचप्रमाणे हा दिवस कामगार दिन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीसाठीदेखील ओळखला जातो.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व वाचक परिवारास हार्दिक शुभेच्छा,कारण तुम्ही आमच्या साठी फक्त वाचक नाही तर क्रांती न्यूज परिवाराचा एक भाग आहात.
More Stories
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
बार्शीचे सुदर्शन शिंदे यांची थेट जिल्हा न्यायाधीशपदी निवड, मेहनतीचं फळ मिळाल