
१३ डिसेंबर २०२० रोजी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने NCERT मार्फत २०० गुणांची परीक्षा घेण्यात आली.यातील दहा प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रद्द करण्यात आले .या परीक्षेत माध्यमिक आश्रम शाळा खामगाव च्या कुमारी मानसी रवींद्र धावडे या विद्यार्थिनीने १९० पैकी १६१ गुण मिळवून खुल्या प्रवर्गातून २०७ वे स्थान गुणवत्ता यादीत मिळवले . या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास ९४००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .यापैकी फक्त ७७४ विद्यार्थ्यांची एनसीईआरटी मार्फत मुख्य परीक्षेसाठी निवड केली गेली .
बार्शी तालुक्यातून फक्त मानसीची खुल्या प्रवर्गातून या मुख्य परीक्षेसाठी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे . तिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण आश्रम शाळा खामगाव मध्ये झाले व आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचा प्रशालेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर ( दादा ) डमरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री डी एन तांबडे सर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन डमरे सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award