काळ भयंकर आला आहे.जीव वाचविणे ह्यालाच सर्वांनी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.त्याला प्राधान्य देत पण आहेत. मृत्यूची भीती प्रत्येकाचा मनात आहे.मृत्युच्या भीतीने का होईना बरेच लोक चांगल काम करायला लागले.आपण चांगल काम केल तर चांगल फळ मिळेल. मृत्यूलाही न घाबरता काही माणसं सामान्य माणसांची खूप लूट करत आहेत .मग ती दवाखान्यातील असो,इंजेक्शन, गोळ्या औषधी संबंधित असो वा किराणा दुकानात, किंवा भाजी मार्केट मध्ये असो.लूट करणारे देवालापण घाबरत नाहीत.कारण घबाड सापडला का लोक लबाड होतात. लोकांचे संकटाचा फायदा ते लुटण्याची संधी आहे असे म्हणून करून घेतात. पण हे विसरतात कि आपण जसे करत आहोत तसेच आपल्याला परत मिळेल.
एका परीवारात एक इंग्रजी सून आली. तिला हिंदि अजिबात समजत नव्हते.त्या घरात एक मोलकरीण होती तिला घरातली सासूबाई “गधी”म्हणाली.सूनेला ते काही समजलं नाही तिने नवर्याला विचारले, गधी म्हणजे काय? नवर्याने वेळ मारून नेण्यासाठी सांगून टाकले गधी म्हणजे “जाडी” दुसऱ्या दिवसी मोलकरीण वर सासूबाई अजून चिडली आणि म्हणाली “उल्लू की पठ्ठी” इंग्रजी सूनेला काही समजलं नाही तिने पुन्हा नवर्याला विचारले ‘उल्लू कि पठ्ठी ‘म्हणजे काय? नवर्याने पुन्हा वेळ मारून नेण्यासाठी सांगून टाकले ‘उल्लू कि पठ्ठी’ म्हणजे ‘हडकुळी “
काही दिवसानंतर सासूबाईंची तब्येत बिघडली. त्या बारीक झाल्या.ते पाहून इंग्रजी सून सासूबाईंना म्हणतात सासूबाई तुम्ही अगोदर ‘गधी’ होता आता ‘उल्लू कि पठ्ठी ‘ दिसत आहेत.
तात्पर्य -आपण जसे करतो तसेच आपल्याला परत मिळते
डरकर रहो ,
आज नही तो कल भगवान के घर जरूर जाओगे।
लेकिन जैसा बिज बोओगे, वैसाही फल पाओगे।
शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे,सिंदखेडराजा-वर्धा.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न