Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदाचा मान बार्शीच्या डिसले गुरूजींना

जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदाचा मान बार्शीच्या डिसले गुरूजींना

बार्शी: बार्शी येथील जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे.