Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना केंद्राने मदत करावी; खासदार ओमराजे निंबाळकर

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना केंद्राने मदत करावी; खासदार ओमराजे निंबाळकर

मित्राला शेअर करा
खासदार ओमराजे निंबाळकर लाइव्ह

ऑक्टोबर-2020 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून भरीव निधी मंजूर करावी.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन उस्मानाबाद जिह्यासह, बार्शी, औसा व निलंग्यासह, महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर 2020 महिन्यात अतिवृष्टी झाल्याने खुप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद जिल्हयात 4 लाख 16 हजार शेतकऱ्यांचे 2 लाख 62 हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुक्यात 75 हजार 781 शेतकऱ्यांचे 68 हजार 768 हेक्टर क्षेत्र व लातूर जिल्हयातील औसा , निलंगा तालुक्यातील 1 लाख 52 हजार 417 शेतकऱ्यांचे 95 हजार 777 हेक्टर शेती क्षेत्राचे अशा एकुण 6 लाख 43 हजार 998 शेतकऱ्यांचे 4 लाख 26,645 हेक्टरवरील क्षेत्राचे तसेच जनावरे, राहत्या घरांचे अतिवृष्टीमुळे खुप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी दि.09 डिसेंबर 2020 रोजी राज्य शासनाने केंद्र सरकार कडे N.D.R.F. मधून 3 हजार 721 कोटीचा प्रस्ताव मंजुर करून निधी राज्य शासनाला वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली होती.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्न उत्तराच्या तासात सहभाग घेऊन केंद्र सरकारची N.D.R.F ची शेतकऱ्यांना आणखीन मदत मिळली नाही असा प्रश्न उपस्थित केला त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री मा.ना.नरेंद्रजी तोमर साहेब व कृषी राज्यमंत्री कैलासजी चौधरी यांनी ऑक्टोबर-2020 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने N.D.R.F. मधून 701 कोटी मंजूर केला असे उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 701 कोटी तुटपुंजी निधी मंजूर करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना निधी देताना वेळ काढू पण केला आहे.तरी केंद्र सरकारने N.D.R.F. मधून भरीव निधी मंजूर करावा व तात्काळ राज्य शासनास वर्ग करावा अशी मागणी केली.