मानवी जीवनच असे आहे कि प्रत्येकाला मोठे व्हायला आवडते.मोठे होणे काही चुकीची नाही.प्रत्येकाने मोठे झालच पाहिजे.या जगात फक्त वडिलच असा माणूस आहे की त्याला आपला मुलगा पुढे गेला की आनंद होतो.बाकी कुणालाच आनंद होत नाही.कधी कधी मनुष्य ज्याच्या सानिध्यात राहतो, त्याच्याकडून बर्याच गोष्टी शिकतो.तो पण त्याला मनापासून शिकवतो. ज्याच्यामुळे मोठा झाला,ज्याच्यामुळे प्रगती झाली.हा त्याच्या पेक्षाही मोठा होण्यासाठी धडपडतो.त्याच्यासाठी तो उपकार विसरून त्यालाच डिवचायला लागतो.
गोष्ट सर्वांना माहितच असेल.एकदा गरूडाचा पाठीवर कावळा बसला.गरूड वर आकाशात उडायला लागले.त्याच्याबरोबर कावळा पण विनासायास वर गेला.कावळ्याला वर येण्याचा खूप आनंद झाला.ज्या गरूडामुळे तो वर आला.आता तो कावळा वरून गरुडाला टोचा मारत आहे.गरूड आणखी वर आकाशात गेले.कावळा पुन्हा,पुन्हा गरूडाला टोचा मारत आहे.गरूडाने विचार केला माझामुळे हा वर आला आणि मलाच त्रास देत आहे.त्याने कावळ्याला धडा शिकवायचं ठरविले.गरूड आणखी आकाशात उंच उडाले.गरूडाला उंच उडण्याची सवयच असते पण आता ऑक्सिजन कमी पडल्याने कावळ्याला श्वास घेण्यास त्रास होवू लागला.त्याला चक्कर आली तो.वरून खाली पडला आणि मेला.
बडा आदमी बनना है तो,पहले
छोटी हरकते करना बंद करो।
तात्पर्य- ज्याच्यामुळे आपण मोठे झालो त्याच्यावर कधीही उलटू नये
नीच व्यक्ती वो होता है जो प्रतिष्ठा पाने के बाद सबसे पहले उसी व्यक्तीको नष्ट करने की कोशिश करता है जिसकी मदद से वो बडा बनता है।
लेकिन उसके सामने नही।
जिसने तुम्हे बडा किया है।
शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award