Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > डीआरडीओ ने केली अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-P’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

डीआरडीओ ने केली अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-P’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

मित्राला शेअर करा

दि. 28 जून 2021 रोजी भारताने ‘अग्नी-P’ या अण्वस्त्रक्षम आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.

ओडिशा किनारपट्टीवरील बालासोर येथील ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावर संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) नेतृत्वात नव्या पिढीच्या या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.

क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा माग घेण्यासाठी पूर्व किनारपट्टीवर विविध प्रकारची स्वयंचलित दूरप्रक्षेपण तसेच रडार यंत्रणा कार्यान्वीत आहेत. उच्च दर्जाची अचूकता साधण्यासाठी हे क्षेपणास्त्र भूमितीविषयक सर्व निकषांचे तंतोतंत पालन करते.

‘अग्नी-P’ विषयी..

अग्नी-P’ हे अग्नी-श्रेणीतील नव्या पिढीचे प्रगत क्षेपणास्त्र आहे. ते कॅनिस्टिराइज्ड क्षेपणास्त्र असून त्याची 1000 ते 2000 कि.मी. पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

अग्नी’ची मालिका…

स्वदेशी ‘अग्नी’ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या मालिकेमध्ये आतापर्यंत मारा करण्याच्या शक्तीनुसार 5 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. ते आहेत –

अग्नी 1 – 700 किलोमीटरचा मारा पल्ला
अग्नी 2 – 2000 किलोमीटरचा मारा पल्ला
अग्नी 3 – 3000 किलोमीटरचा मारा पल्ला
अग्नी 4 – 4000 किलोमीटरचा मारा पल्ला
अग्नी 5 – 5000 किलोमीटरचा मारा पल्ला