दहावीच्या विद्यार्थांना कलेचे वाढीव गुण मिळणार
कलासंचालक व परिक्षा नियत्रंकाची चौकशीचे आदेश
मुंबई :
कलासंचालक राजीव मिश्रा व परिक्षा नियंत्रक मुंबई यांनी उच्च व तंत्रशिक्षण यांना चूकीचे मार्गदर्शन केल्यामुळे शासनाने 26 मार्च 2021 रोजी अध्यादेश काढून या वर्षी दहावी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांना एलेमेंटरी व इंटरमिजिएट कलेचे वाढीव गुण दिले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता त्यास महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने तिव्र आक्षेप घेवून राज्यभर सर्व जिल्हयात एकाच वेळी होळी निषेध आंदोलन करून अध्यक्ष विनोद इंगोले उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे _ हस्तेकर सरचिटणीस प्रल्हाद सांळूके यांनी राज्यातील लाखो विद्यार्थावर अन्याय करणारी व पालकामध्ये उद्रेक निर्माण करणारी संतापजनक बाब तातडीने तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दुरध्वनीद्वारे लक्षात आणून दिल्यानंतर दिनांक 30 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तातडीने झूम मीटिंग महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी यांच्या सोबत लावली. सदर मिटिंग मध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश, सरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी मंत्रीमहोदयांनी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या दिलेल्या निवेदनावर तात्काळ बैठक लावली त्यानिमित्त त्यांचे सुरुवातीला स्वागत केले महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय विनोद इंगोले यांनी दिनांक 26 मार्च 2021 चा एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नये हा विद्यार्थांवर अन्याय करणारा शासन निर्णया विरुद्ध तात्काळ मागे घ्यावा ती भूमीका मांडली त्यावर तंत्रशिक्षण मंत्री यांनी कला संचालक राजीव मिश्रा, यांना थेट विचारणा करून विद्यार्थ्यांचे तुम्हाला हित नको आहे का? आपण का सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे मनात धरून आहात चुकीची माहिती तंत्र शिक्षण विभागाला का देतात? असे खडे बोल सुनावले.
प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी तर कला संचालक राजिव मिश्रा हे उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच मंत्र्यांना चुकीच्या माहिती देवून आजपर्यंत दिशाभूल करत आहे . त्यामधूनच हा प्रकार घडला आहे यावर वेळोवेळी दिलेली निवेदने व पुरावा देत जोरदार खंडन करुन आक्षेप घेतला, गेल्या वर्षी सुद्धा परिक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फोडल्याने लाखो विद्यार्थी पालकांची हरासमेंट केली व लाखो रुपयांचे नुकसान करून महाराष्ट्र शासनाची अब्रु देशभर घालावली पेपरफोडीस कारणीभूत आधिकारी मोकाट फिरत आहे तसेच दहा दहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त लोकांची परिक्षा कामात नियुक्त केली जात आहे . संचालक व परिक्षा नियंत्रक यांचा संवाद नाही त्यामुळे कला विषयाचा प्रचार प्रसारऐवजी ऱ्हास होत असल्याने परिक्षा प्रमूख व कलासंचालक राजिव मिश्रा यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी अंती कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आक्रमकपणे लावून धरली .
प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी सांगितले की कला संचालक यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुण देण्यात येऊ नये अशी चुकीची शिफारस शासनास करून जे विद्यार्थी एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षा पास आहेत त्यांचे प्रस्ताव वाढीव गुणासाठी बोर्डाकडे सादर झालेले आहेत त्यांना सुध्दा वाढीव गुण देवू नये अशी चूकीची शिफासर शासनास मंत्री महोदयांना बदनाम करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा डाव असल्याचे सांगितले .
यावर उदय सामंत संतापले व कलासंचालकास धारेवर धरुन चुकीच मार्गदर्शन शिफारस केल्याने समज देवून मंत्रीमहोदय उदय सामंत यांनी खालील निर्णय घेण्यात आल्याचे सर्वानुमते जाहीर केले
1) दहावी परिक्षा देणारे विधार्थी इलेमेंटरी .व इंटर मिजिएट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थांना कलेचे वाढीव गुण दिले 2 ) ज्यांनी परिक्षा दिली नाही त्यांना मे मध्ये परिक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे ( केवळ १०वीचे विधार्थ्यांना ) 3) प्रमाणपत्र वेळेवर मिळण्याची व्यवस्था करणार 4) सेवानिवृत्त शिक्षकांना पारिक्षेच्या कामात घेतले जावू नये 5) परिक्षा नियंत्रक व कलासंचालक यांची चौकशीचे आदेश दिले . 6 ) परिक्षा पेपर फोडणाऱ्या विरोध कडक कारवाईचे संबधित पोलिस स्टेशनला बैठकिमधूनच फोन करून माहिती देण्यात आली
आदी मागण्या संघटनेच्या मंजूर करण्यात आल्या या बाबतच्या. सर्व सूचना शालेय शिक्षण विभाग व माध्य .व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाला देण्यात आली
या बैठकीस शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव , परिक्षा मंडळाचे अधिकारी कलासंचालक मिश्रा उपस्थित होते .,
या निर्णयामुळे राज्यातील सर्व विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यासाठी मा मंत्री महोदय यांचे स्वीय.सहायक पी .ए. देसाई, कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे सहसचिव मिलिंद शेलार, कोषाध्यक राजेश निबैकर ‘ . विवेक महाजन ,संजय जाधव नबाब शहा , कोकरे , रमेश तुंगार,सुनिल महाले, दत्तात्रय सांगळे, सचिन पगार, नरेंद्र गुरव, अजय भदाणे, बीसी पाटील सर्व जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांनी आंदोलन करून यश संपादन केले .
More Stories
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड