
तेर – उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदावर डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबियांचे निष्ठावंत कार्यकर्ते मज्जीद रशीद मणीयार यांची बिनविरोध निवड झाली. अनेक मातब्बर ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचासाठी इच्छुक असतानाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एका सामान्य व निष्ठावंत कार्यकत्याला उपसरपंच पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
विद्यमान उपसरंपच तथा काही काळ प्रभारी सरपंच म्हणून कामकाज पाहिलेल्या बाळासाहेब कदम यांनी काही दिवसांपूर्वी उप सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.
ग्रामस्थांकडून सत्कार…
मज्जीद माणियार यांच्या निवडीनंतर गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बबलु भैय्या युवा मंचातर्फे नवनिर्वाचित उपसरपंच मज्जिद मनियार यांचा जंगी सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बबलु भैय्या मोमिन, मतीन मोमिन, आखिल काझी, इद्रिस काझी, पत्रकार सुभाष कुलकर्णी, ग्रा.पं.सदस्य ईरशाद मुलानी, बापु नाईकवाडी, सुमेध वाघमारे, हरी खोटे, नजीब मासुलदार, जेष्ठ मंडळी व बबलु भैय्या युवा मंच चे कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन