दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
संपूर्ण जगात कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील कामाचे नियोजन बिघडले आहे त्यातच भारतातील, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अभ्यास परीक्षा यावर सर्वात जास्त फटका बसला आहे.
दहावी ,बारावी यांचे परीक्षा वेळापत्रक शिक्षण विभागाने/मंडळाने दोन ते तीन वेळेस नियोजन पुढे मागे झाले.
एप्रिल – मे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात वाढीव वेळेनुसार बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर कालपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहेत .
कोरोनासंबंधी विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन विद्यार्थ्यांनी करावे असेही मंडळाने आवाहन केले आहे .
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न