आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करणार; अदर पुनावाला यांचा सुचक इशारा
सत्य बोललो तर शरीर कापले जाईल- पूनावाला
भारतातील 90 टक्के कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी भारतातील श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या मिळत असल्याचं सांगितलंय. साध्या अदर पूनावाला हे लंडन मध्ये वास्तव्यास आहेत यामुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये कोरोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा दिलाय. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक आहेत.
भारतीय राज्यांमधील मुख्यमंत्र्यांकडून, व्यवसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी केली आहे.त्यांची ही मागणी ही धमकीच्या स्वरुपात आहे धमक्या हा ‘एक अतिरेकीपणा आहे’ पुढे पुनावाला यांमी म्हटलंय की, यांतील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर अभूतपूर्व आहे.असे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसापूर्वी गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे.
साध्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे या इन्स्टिट्यूटला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अदर पुनावाला हे या कंपनीचे CEO आहेत. सध्या महत्त्वाच्या जागी आणि प्रकाशझोतात असणाऱ्या अदर पुनावाला यांच्या जीविताला धोका संभवू शकतो. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.
कोविशिल्ड लसीच्या माध्यमातून देशाला आशेचा किरण दिसत असताना अश्या घटना म्हणजे नक्कीच धक्कादायक बाब आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न