करावे तेंव्हा खावे अश्या पद्धतीचे काम असणार्या नाभिक समाजाला सलून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी व त्यांना अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे संपूर्ण
गेल्या मागच्या २२ मार्च च्या लॉकाडाऊन च्या काळामधील नाभिक समाजातील २७ समाज बांधवांच्या कोरोना माहामारीच्या संकटात प्राण गमवावा लागला अर्थात काम धंदा नसल्यामुळे प्रपंचाच चालवत असताना पोटाची खळगी भरू शकले नसल्यामुळे नाभिक समाजातील सत्तावीस बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारने या नाभिक समाजाच्या विचार केला नाही खूप गांभीर्याचा प्रश्न आहे आज नाभिक समाजा वर अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे शासनकर्ती जमात या अल्पसंख्यांक नाभिक समाजाकडे लक्ष देत नाही आहे आम्हाला भीक नका द्या आमच्या व्यवसाय चालू करा हीच तुम्हाला पाया पडून विनंती करतो जेणे करुन आमच्या प्रपंच चालेल याच्या विचार करा नाभिक समाज बांधव हा भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन स्वतःची पोटाची खळगी भरत आहेत आज दुकानाचे भाडे सुद्धा देऊ शकत नाही प्रपंच कुठे चालेल याची दखल शासनाने घेतली पाहिजे व नाभिक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे हीच अभिलाषा बाळगतो नाही तर संपूर्ण नाभिक समाज दयनीय परिस्थिती उभ्या महाराष्ट्रात हलाखीची होणार आहे
संसाराचा गाळा कसा चालावा हा प्रत्येक नाभिक समाजाला प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून शासनाने याची दखल घ्यावी हीच आर्त विनंती शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष रामचंद्र येशी यांनी समाजाच्या वतीने केली आहे.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत