•केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय,अनेक विद्यार्थी संघटनांनी केले सरकारचे अभिनंदन
•ग्रामीण,आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार
अकोला-पहिली ते आठवी पर्यंत शासकीय अनुदानित शाळांमध्ये मध्यान भोजनाच्या विद्यार्थ्यांच्या राशी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये थेट टाकण्याचा निर्णय घेऊन केंद्रीय मंत्री नामदार रमेश पोखरियाल निशंक व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी १२ कोटी विद्यार्थ्यांना दिलासा देऊन पारदर्शक कारभार उदाहरण देऊन पोषण आहार उपलब्ध करून करून देण्याच्या दिशेने पावले उचलली आहे.
सध्या या काळामध्ये विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाता येत नाही त्यामुळे त्यांच्या पोषक आहाराचा प्रश्न निर्माण झाला यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सात वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेऊन १००० कोटी वीस लाख रुपयांची रक्कम थेट ११ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पोषक आहाराची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक व राज्य मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी घेऊन ग्रामीण आदिवासी दुर्गम तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उपयोगी पोषक आहार सध्याच्या काळामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे अनेक विद्यार्थी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रमेश पोखरियाल व राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांचे अभिनंदन केले.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान